शिववंदना - An ode to the Great Maratha Emperor Shivaji Maharaj

शिववंदना

Shivaji Maharaj Wallpapers - Top Free Shivaji Maharaj Backgrounds ...
छत्रपती शिवरायांना मुजरा मानाचा l
सिंहासनाधिपती झाला,राजा आमचा ll

अग्निकंकण स्वराज्याचे,हाती बांधियले 
आशिष मातृहृदयाचे,शिवबास लाभियले l
हुंकार मना-मनातील कृतीत  उमटले 
आज राजे शिवाजी,छत्रपती जाहले ll

गान शौर्याचे,दशदिशांत निनादले
तोरण विजयाचे,घरोघरी लागले l  
अर्ध्य सप्त-सरितांचे,शिवसुर्यास अर्पियले 
आज राजे शिवाजी,छत्रपती जाहले ll

मंत्रोच्चारे,छत्र-चामरे,मस्तकी ढाळीले 
नजराणे बहु नम्र,शिवदरबारी आले l
ध्वजकेसरी बुरुजावरी,अभिमाने फडकले 
आज राजे शिवाजी,छत्रपती जाहले ll

करवूनी राज्याभिषेक,स्वराज्यास गौरविले
रायगडीचे सिंहासन तेजाने तळपले l
हाती घेतल्या राजदंडाने देश-धर्म रक्षियले l
आज राजे शिवाजी छत्रपती जाहले ll

छत्रपती शिवरायांना मुजरा मानाचा l
त्रिवार करूया मुजरा मानाचा ll

Have you also read?





Comments