Gurumantra | Marathi Poem - गुरूमंत्र

शीर्षक - गुरूमंत्र


रानफुला रे रानफुला...
नाही सभोवार काळी आई
ना खडक पाझरे तुज ठाई l
उजाड माळरानी उगवला कसा
लोभ रतीकुंजाचा तुज ना कसा?l l

रानफुला रे रानफुला...
नमवित पाषाण तू उमलत राही
कळ्या देठांशी खुलवत जाई l
तळपत्या उन्ही कोमल कसा
 लवून वादळी तू उभा कसा ?l l

रानफुला रे रानफुला...
असे निवडुंग तुझे सोबती
काटे बोचरे ना तुज कांती l
धर्म पद्मदलाचा कळतो कसा
संग संतजनांचा धरीतो कसा ?l l

रानफुला रे रानफुला.. 
स्वैर उधळल्या खुरांनी 
पडला जरी कोलमडून
हसतो कसा हिरव्यापानी दडून?l l

रानफुला रे रानफुला..
गुपित तुझ्या फुलण्याचे
सांग वाऱ्याच्या कानात l
गुरूमंत्र तुझा जपेन
मी ही माझ्या जीवनात l l

रचनाकर्ती - अॅड.अनिता भि.देशमुख

Have you also read?





Comments

  1. रानफुला रे रानफुला
    किती शिकवतोस तू जगाला

    सगळ्यांनीच आत्मसात केले तर
    अजुन सुंदर करशील विश्वाला

    ReplyDelete
  2. खूप सुंदरफुल'

    ReplyDelete

Post a Comment