तेजोनिधी
तेजोनिधी
जलद भरुनी आले
नभ कृष्णकांती जाहले
उंच पहाड अलगद
मलमली धुक्याने वेढले ll
खेळ ऊन-सावलीचा बहरला
अवचित तेजोनिधी प्रकटला
कवडसा असा रवी-किरणांचा
हिरव्या धरेवरी विसावला ll
रूपेरी प्रकाश वर्षाव
साठल्या जळात भिजला
वर्ख चंदेरी लेऊनी
संथ जलाशयी पसरला ll
मृदु -मुलायम तृणांकुरे
गडद हिरवी झुडुपे
पाहुनी अंत:चक्षु निवले
रूप सृष्टीचे हे साजिरे ll
-Adv. Aneeta B. Deshmukh
Have you also read?
Comments
Post a Comment