अबोल बोल वृक्षाचे


अबोल बोल वृक्षाचे


अबोल वृक्ष हा बोलतो काही
गूज मनीचे सांगू पाही l
निष्पर्ण जरी मी एकाकी
फुलांनींही साथ सोडली ll


लोपले हिरवे वैभव सारे
हवा पावसाळी जरी कुंद जाहली l
पानगळीचे मज दुःख नाही
जलरत्ने घेऊनी ऋतु वर्षा आली ll

 पाऊसकाळी पहाट वेळी
तरुवर जलात भिजली l
जलबिंदूंनी फांदी-फांदी सजली
चक्षूस या हिरेजडित भासली ll

सुख-दुःखाचे ऋतु येती जाती
तुटती जरी नाती-गोती l
हृदयी ओल धरुनी राही
ऋतू हिरवा फुलेल देही ll

Have you also read?





Comments