चांदणफुले

चांदणफुले

Creative Farmer Dwarf Plant Crape Jasmine Nanthyaar Vattam ...

हिरवा  श्रावण
फुलात  हसला  ।
पानात  हिरव्या
चांदण  ल्यायला ।।

नभीच्या  तारका
उतरुनी  आल्या ।
झाडाला  अंगभर
लगडून  गेल्या ।।

फुलभारे  वृक्ष  वाकले
श्रावणाचे सोहळे  रंगले ।
अंगणी  फुलांचे  सडे  शिंपले
डहाळयानी  गोंदले चांदणफुले ।।

मनभावन  श्रावण
चित्ती  मोदभरे ।
कुसुम  कवने
शब्दातुनी  झरे  ।।

Have you also read?





Comments