A Poem on Friendship - मैत्र जीवांचे

मैत्री तुमची माझी
नाही देण्या-घेण्याची 
न आणा-शपथांची l

साठवण असे फक्त 
दिल्या घेतल्या स्मितांची l
आठवण असे निरंतर
 साथ दिल्या हातांची l l

मैत्री तुमची माझी 
आहे मीठ भाकरीची l
एक नसले यातले तर 
चव जाईल जगण्याची l l

मैत्री आपली अशी 
ना तू पुढे ना मी मागे 
नसे शर्यत जीवनाची l
सोबतीने चालू गड्याहो
काही वळणे आयुष्याची l l

मैत्र जीवांचे असे
सदा संगती वसे l
हितगुज सुख-दुःखाचे
मनोमनी हसे l l

रचनाकर्ती - अॅड.अनिता भि.देशमुख

Have you also read?





Comments