Rangabhed | रंगभेद 🌈 - Marathi Poem


भक्तीचा मार्ग एकच

तरी पंथ वेगळे केले |

रंग इंद्रधनूतील माणसाने

आपसात वाटून घेतले |


भगवा,हिरवा,निळा,पांढरा

भेद रंगांचे जीवापाड जपतात |

पण,रंग रक्ताचा लाल एकच

मर्म हे कसे,सारेच विसरतात..? |


रंग मिळूनी नभी इंद्रचाप खुलतात

करुनी वेगळे इथे भिंती उभारतात |

निर्जीव भिंतींच्या या रंगांसाठी

देह सजीवांचे का रक्ताने माखतात..? |


तुमच्या आमच्या प्राणासाठी

सैनिक जीवाचे मोल देतात |

नका विसरु ते सीमेवरती 

देशासाठी शहीद होतात l l


रचनाकर्ती - अॅड.अनिता भि. देशमुख

Have you also read?

5 SUSPENSE THRILLER SHOWS ON NETFLIX THAT YOU MUST WATCH!

How to Deal with Depression in these Pandemic Times?

Best Beauty Tips for Women and Men: Hair Styling and Skincare for Natural Beauty.

A Poem on Friendship - मैत्र जीवांचे.

SEO Strategies for the B2B Sector in 2020

Comments